डोंबिवलीत १०० टक्के वसुली होते तर, इथे टोरेंट कंपनी यायचं काय कारण आहे ?:-आ राजू पाटील

तर चार कंपन्या येऊदे,वीज ग्राहकांना त्यांचा चॉईस मिळुदे, हीच आमची मागणी आहे !:- आ राजू पाटील

DT न्यूज /स्वदेश मालवीय

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका [वितरण फ्रँचायझी क्षेत्र वगळून], अंबरनाथ नगर परिषद व  आसपासचे क्षेत्र यांचा समावेश असलेले भौगालिक क्षेत्र आणि वसई विरार महानगरपालिका व आजूबाजूचा परिसर या क्षेत्रात येत्या काळात वीज वितरण करणार  असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान टोरेंट पॉवर लिमिटेडने नुकतीच वृत्तपत्रात जाहिर सूचना दिली आहे.

वीज कायदा २००४ च्या कलम १४ आणि कलम १५ अन्वये पालघर, ठाणे आणि लगतच्या क्षेत्राकरिता वितरण परवाना मंजूर करण्यासाठी टोरेंट पॉवर लिमिटेडने दाखल केलेल्या अर्जावर सूचना व हरकती मागवल्या आहेत. यालाच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करून ट्विट करत महावितरणला सक्षम करण्याऐवजी हा खासगीकरणाचा घाट कशासाठी व कोणासाठी ? असा सवाल उपस्थित केला आहे..

एका कंपनीची एकाधिकारशाही ग्राहकांसाठी नक्कीच दिलासादायक नसेल.सरकारने लोकांच्या सुचना ऐकून निर्णय घ्यावा असेही मत त्यांनी मांडले आहे.

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की माज म्हणण एवढंच आहे की, महावितरणची सेवा आहे ती एवढी समाधान कारक नाही,याबद्दल दुमत नाही.परंतु टोरेंटचा अनुभव देखील काही जणांना चांगला नाहीये ना, भिवंडी असो, दिवा, कल्याण ग्रामीण असो.. टोरेंट ही ४३ टक्केच्या खाली वसुली असेल तर वसुलीसाठी आलेली संस्था होती,परंतु डोंबिवली सारख्या शहरात १०० टक्के वसुली होते,इथे अशी कंपनी यायचं काय कारण आहे? जेव्हा ते महावितरणच इन्फ्रास्ट्रक्चर वापरणणार आहे. यायचं असेल तर चार कंपन्या येउदे  ग्राहकांना त्यांचा चॉईस मिळुदे हीच आमची मागणी आहे.

त्यामुळं नागरिकांनी वेळेत हरकती घेणे आवश्यक आहे आणि मोठ्या प्रमाणात हरकती आल्यातर टोरेट जाचातून सुटका मिळू शकते. येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका [वितरण फ्रँचायझी क्षेत्र वगळून], अंबरनाथ नगर परिषद व आसपासचे क्षेत्र आणि वसई विरार महानगरपालिका व आजूबाजूचा परिसर या क्षेत्रात टोरेंट पॉवर कंपनी येणार का हे पहावे लागेल.

टिप्पण्या