चोरी गेली रिक्षा ची घटना सीसीटीव्हीत कैद

 ५०हजाराची रिक्षा जप्त;आरोपी गजाड 


DT न्यूज/स्वदेश मालवीय

डोंबिवली: ऑटो रिक्षा चोरी करणा-या चोरास डोंबिवली पोलीसांनी अटक करुन ५०,०००/–रुपयेचा मुददेमाल हस्तगत केला आहे.

 डोंबिवली पोलीस ठाणे हददीतील रवी पाटील ग्राउंड डोंबिवली पूर्व या ठिकाणी फिर्यादी आनंद श्रीधरराव मिरजकर या वयस्कर ने आपली रिक्षा १ जनवरी रोजी रिक्षा क्रमांक एम.एच.०५ सीजी ७०५० ही पार्क करुन ठेवली असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली. म्हणुन डोंबिवली पो ठणेत भादवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्हयाचा तपास करीत असताना सपोनि योगेश सानप सपोनि / बळवंत भराडे, पोहवा वाघ; पोहवा:  सरनाईक, पो.शि: राठोड; पो.शि. सांगळे यांनी दिनांक ०४/०१/२०२३ रोजी नमुद गुन्हा घडलेल्या परीसरात तसेच ज्या दिशेने आरोपीत गुन्हयातील चोरी केलेली होती,

                रिक्षा चोरी सीसीटीव्हीत केद 

 ऑटो घेवुन गेला त्या मार्गाचे सीसीटीव्ही ची बारकाईने पाहणी करून, त्या आधारे गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने आरोपी महेश आनंद देवाडीगा, वय ३५ वर्षे, यास सांगली, डोंबिवली पूर्व परीसरात सापळा रचुन त्यास ताब्यात घेवुन त्याने नमुद गुन्हयातील चोरी गेलेली एम. एच:- ०५ सी. जी:-७०५० ही हस्तगत केली.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३ कल्याण श्री. सचिन गुंजाळ सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन सांडभोर सो, पोनि / तडवी सो यांचे मार्गदर्शनाखाली डोबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, सपोनि / बळवंत भराडे, पोहवा:- ५०३/ विशाल वाघ, पोहवा- १३०७/प्रशांत सरनाईक, पो.ना. ४५७/ दिलीप कोती पो. अं ३४०६/ शिवाजी राठोड, पो. अं ८४१३/नितीन सांगळे, पोअ ३९९८/ पाटील यांनी कामगिरी केली आहे.

टिप्पण्या