आदर्शम् ह्यूमन राइट्स फाउंडेशनच्या वेबसाईट आणि ॲप्स लोकार्पण
फाउंडेशन तर्फे मुरबाड येथे अनाथालय उभे करण्याचा संकल्प आहे:-संजय शिर्के
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण: कल्याण पूर्व विजयनगर येथे आदर्श मानवाधिकार संघटचेचा आदर्शम् हुमान राईस फाउंडेशन हा मोठा वटवृक्ष निर्माण होत असून, गेले दहा वर्षांमध्ये संस्थापक अध्यक्ष संजय नागेश शिर्के आणि त्यांचे पदाधिकारी सहकारी यांनी केलेल्या सामाजिक कामाची पावती आज मिळत आहे, देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते या फाउंडेशन तर्फे नवीन वेबसाईट आणि ॲप्स लोकार्पण करण्यात आलं, नागरिकांना या वेबसाईट तर्फे संपूर्ण माहिती मिळत राहील त्यासोबत आदर्शम् ह्यूमन राइट्स ॲप्स तर्फे आपल्याला समस्या आणि त्यावरील समाधान यामध्ये मिळणार असून लवकरच या फाउंडेशन तर्फे मुरबाड रोडवर अनाथालय उभे करण्याचा संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष संजय नागेश शिर्के यांनी केला .
ह्या वेबसाईट आणि ॲप्स उद्घाटन समयी महेश गायकवाड यांनी देखील या उपक्रमात आपला खारीचा वाटा असेल असे जाहीर केले
त्यासोबत नागरिकांना दानशूर व्यक्तींना या स्तुत्य उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन देखील केले.
या समयी आदर्शम् ह्यूमन राइट्स फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर,आणि फाउंडेशन चे उद्दिष्ट यावर भाषणे झाली, मान्यवरांचे सत्कार झालेत,
प्रत्येकाने आपापले विचार मांडून मानव अधिकाराचे महत्व पटवून दिले, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड, समन्वयक प्रशांत काळे, माजी नगरसेवक देवानंद गायकवाड, संगीता गायकवाड, प्रशांतबोटे, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय शिर्के,
पत्रकार विवेक जगताप, विघ्नेश जैन, प्रकाश कांबळे उपाध्यक्ष, संतोष भंडारे संचालक सचिव, रामचंद्र मोहिते मुख्य सचिव,किशोर बनसोडे खजिनदार, राजेंद्र मगर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, प्रकाश घेगडमल उपाध्यक्ष महाप्रदेश ,किशोर खरात,प्रसाद शिर्के. अॅड.सिमा मोजार, निलेश यशवंतराव फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे नियोजन देखील करण्यात आले होते.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा