विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा आणि गुड टच बॅड टच बद्दल जनजागृती
रेझिंग डे निमित्त विठ्ठलवाडी पोलिसांनी केली विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा आणि गुड टच बॅड टच बद्दल जनजागृती.
DT न्यूज/स्वदेश मालवीय
उल्हासनगर : आज दिनांक 06/01/2023 रोजी सकाळी 11.00 वा.ते 12.15 वा. चे दरम्यान पोलीस" रेझींग डे" सप्ताह अंतर्गत झोन 4 विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील उल्हास विद्यालय, मराठा सेक्शन 32, उल्हानगर 4 चे विद्यार्थी, विध्यार्थीनी यांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमात म.पो.उप नि/ प्रियांका सादळकर यांनी विद्यार्थांना करियरबाबत सायबर सुरक्षा बाबत तसेच गुड टच व bad टच बाबत मार्गदर्शन केले.
तसेच मिलिंद पाटील, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे जिल्हा समन्वयक यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा व मादक व अमली पदार्थाचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.
सदर वेळी उल्हास विद्यालयाचे एकूण 6 शिक्षक व 125 ते 150 विद्यार्थी/विद्यार्थिनी, व विठ्ठलवाडी पोलिसांचे अंमलदार हजर होते.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा