परीवर्धे येथे शिक्षण दर्शन क्रीडा महोत्सव संपन्न,.
मनिलाल शिंपी यांचामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते :गटविकास अधिकारी घोरपडे
DT न्यूज/स्वदेश मालवीय
नंदुरबार :शहादा तालुक्यातील परीवर्धे येथे विस्तार अधिकारी ममता पटेल यांचा विशेष प्रयत्नाने बीट १ मधील परीवर्धे, पाडळदा,आणि शिरुड केंद्राचा एकत्र शिक्षण दर्शन क्रीडा महोत्सव २o२३ चे आयोजन करण्यात आले होते. स्वतंत्र भारताचां अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ प्रकारचा स्पर्धा आयोजित करण्यात आले.
शहादा पंचायत समितीचे सभापती विरसिंग ठाकरे यांचा अध्यक्षतेखाली , जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, पंचायत समिती सदस्य गणेश पाटील, सुदाम पाटील, डॉ.नाईक, यांचा प्रमुख उपस्थितीत गटविकास अधिकारी घोरपडे साहेब, व परिवर्धे येथील आदर्श रत्न आर एस पी कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचा हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्हा परिषदेचा ३५ शाळांमधील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
३००विद्यार्थ्याना गावचे सुपुत्र , मानव सेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांचा विशेष संकल्पनेनुसार डोंबिवलीचे बिझनेस मॅनेजमेंट चे मोटिव्हेशन लेक्चरर उद्योगपती किशोर अढळकर यांनी त्यांचे आई बाबा कै. विश्वनाथ अढळकर व काशीबाई अढळकर यांचा स्मृती पित्यर्थ गोल्ड ,सिल्व्हर,आणि ब्राँझ असे ३०० मेडल खेळाडूंना सन्मान म्हणून देण्यात आले. या वेळी पाहुण्यांचे स्वागत चिमुकल्यांनी झांज ढोल चा माध्यमातून उत्कृष्ट असे नृत्य सादर करून केले. यावेळी गटविकास अधिकारी घोरपडे यांनी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले की , प्रत्येक शाळेतून खेळाडूंनी हा शिक्षण क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला,त्याबद्दल आयोजक शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल यांच्यासह सर्व शिक्षक बंधू भगिनींचे अभिनंदन आणि कौतुक केले.या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळाबद्दल प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या तालुक्याचे ,आणि परीवर्ध्याचे सुपुत्र डॉ. मनिलाल शिंपी यांचे योगदान खूप मोलाचे आहे, अश्या शब्दात अभिनंदन केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, पंचायत समिती सभापती विरसींग ठाकरे, गणेश पाटील, यांनीही मनोगत व्यक्त केले.
काही निवडक शिक्षक बंधू भगिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षण दर्शन क्रीडा महोत्सव आयोजित केल्यामुळे आम्हला खूप प्रेरणा मिळाली अश्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन, प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल यांनी केले.शिक्षण दर्शन क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी तीन केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. तसेच जी.एस. पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्यापक जगदीश पाटील यांच्यासह सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.आणि शिक्षण दर्शन क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा