४२० करणार्या टोळी कोळसेवाडी पोलिसांनी केली जेरबंद..
पैसे दुप्पट करून देतो सांगून फसवणुक करणाऱ्या परराज्यातील टोळी कोळसेवाडी पोलिसांनी केली जेरबंद.
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण: फातीमा इस्माईल कर्वेकर राहणार ठाणे पश्चिम यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात येवुन, त्यांना ठाणे येथे भेटलेल्या अनोळखी महीलेने पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवुन फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांना फोन करून पैसे देण्याबाबत तगादा लावल्याने फिर्यादी हे पैसे देण्यास तयार झाल्याने आरोपीत महीलेच्या सांगण्यावरून तिचे अनोळखी साथीदारांनी शिवाजी कॉलनी रोड, भाजी मार्केट कोळसेवाडी कल्याण पूर्व येथे फिर्यादी यांचेकडुन १,८०,०००/- रूपये घेवुन त्यांना पिशवी मध्ये कागदांच तुकडयांचा बंडल देवुन पळून गेले .
पहिला एक सौदी रियाल देऊन विश्वास संपादन करून दुसऱ्या डील मध्ये सावज टिपणारी महिला सहित चार जणांची टोळी कोळशेवाडी पोलिसांनी जेर बंद केली आहे..
चंद्रकांत कदम पीआय प्रशासनवरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे डि.बी.चे सहा. पोलीस निरीक्षक पगारे, सहा पोलीस निरीक्षक बोचरे व तपास पथकातील कर्मचारी यांनी विविध ठिकाणी फसवणुकी बाबत तपास करून ,सापळा रचुन शिवाजी कॉलनी रोड, भाजी मार्केट, कल्याण पूर्व येथून आरोपीत इशाख शरफ शेख वय ४० वर्ष नेवाळीपाडा, ता. अंबरनाथ जि. ठाणे मुळगाव- दिहात अशोक विहार लोणी, जि. गाविजाबाद, उत्तरप्रदेश सोफीकुल लोन शेख वय- ४२ वर्ष, रा. हेदसन गेट ता. कल्याण जि. ठाणे मुळगांव- जॉयनगर, पो. हरनगर, थाना- नाकाशीपाडा, जि. नोदीया, पश्चिम बंगाल, इम्रान मोहम्मद इक्बाल खान बस– ३० वर्षे, रा. हेदुसनगेट ता. कल्याण जि. ठाणे. मुळगांव- बदरपुर, जियातपुर, मोडबन, पश्चिम दिल्ली यांना शिताफीने अटक करण्यात आली असुन त्यानंतर अटक आरोपीत यांची गुन्हयातील साथीदार महीला हमीदाबीबी जाफरअली गाजी रा. नेवाळी ता. आंबरनाथ जि. ठाणे मुळगांव- बैसनबतलापाडा, बिठारी उत्तर २४ परगना, प. बंगाल हिंस तिचे राहते घरातुन अटक करण्यात आली असुन १,७०,०००/- रूपयाची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा