रेकॉर्डवरील आरोपी कडून 7,29,498/- रु. कि,ची मद्देमाल क्राइम ब्रांच युनिट-3,ने केली जप्त

चालत्या ट्रेन मधून दागीनेनी भरलेला बैग लम्पास करणाऱ्याला  कल्याण, क्राइम ब्रांच पुलिसाने केले अटक

DT न्यूज़/स्वदेश मालवीय

डॉबीवली: डॉबीवली रेल्वे पोलीस ठाणे येथे ३० जनवरी रोजी गाडी क्र ११०४९अहमदाबाद- कोल्हापूर एक्सप्रेस गाडीचे बोगी नं. एस / ६ बर्थ नं. ३७ वरून फिर्यादी झोपुन प्रवास करत होत्या. सदरची गाडी २ ते ४ वा.सुमरास सुरत ते भिवंडी रेल्वे स्टेशन दरम्यान धावत असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांची डोक्याजवळ ठेवलेली लेडीज पर्स आतील १२४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, मोबाईल फोन व रोख अशी एकुण ६,४५०००/- रूपये किंमतीच्या ऐवजासह चोरून नेले बाबत दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यास ताब्यात घेऊन कल्याण युनिट कार्यालयात आणुन नांव पत्ता विचारता त्याने स्वतःचे नांव सुभान अहमद जहीर अहमद, वय 41 वर्षे, राह. डहाणू, जि. पालघर असे सांगीतले. वसई शहर हद्दीतील CCTV फुटेजमध्ये दिसणारा संशयीत इसम हा सुभान अहमद असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास गुन्हयात अटक केली.

 डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई व मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग, मुंबई यांनी सदरचा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारास अटक करुन मालमत्ता हस्तगत करण्याबाबत गुन्हे शाखेस सुचना दिल्या होत्या. त्यास अनुसरुन श्री. सचिन कदम, सहा. पो. आयुक्त, गुन्हे व श्री. अरशुद्दीन शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शन व सूचनानुसार गुन्हे शाखा युनिट-३, कल्याण लोहमार्ग, मुंबई येथील पोलीस अधिकारी व अंमदर यानी  सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असतांना, वसईरोड रेल्वे स्टेशन बाहेर शहर हद्दीतील असलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये एक संशयीत इसम दिसुन आल्याने त्याचा सतत चिकाटीने तपास करता, तो दिनांक ०३ जनव्वर रोजी भायखळा येथे मिळुन आला.


अटक आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द कल्याण रे.पो. ठाणे ; पुणे रे.पो.ठाणे ; भुसावळ रे.पो. ठाणे;  भरुच रे.पो.ठाणे (राज्य गुजरात) येथे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी .डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ  सचिन कदम, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, अरशुद्दीन शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शन व सूचनानुसार प्रकाश चौगुले, पो.उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार राजेंद्र दिवटे, जनार्दन लेकर, रणजीत रासकर, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, सौ. स्मीता वसावे, महेंद्र कर्डीले, रविंद्र ठाकुर, अजित माने, अजीम इनामदार, सौ. सोनाली पाटील, अक्षय चव्हाण, सुनिल मागाडे, गोरख सुरवसे, स्नेहल गडगे यांनी केली आहे.

टिप्पण्या