रस्ते विकास कामाविषयी मनसे आ पाटील यांनी केली टीका

 २१ कि.मी. रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल आनंदी आनंदच आहे:आ राजू पाटील

DT न्यूज/स्वदेश मालवीय

कल्याण: कल्याण-शीळ हा रस्ता सहा पदरी सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम ८० टक्के पार पडले आहे. या रस्त्याच्या कामातील २० टक्के जागा अद्याप संपादित करण्यात आलेली नाही. संपादनाचा मोबदला मिळाला नसल्याने या कामात अडसर आहे. या रस्ते विकास कामाविषयी मनसे आमदार पाटील यांनी वारंवार टीका केली आहे.

                   मनसे आ. राजू पाटील 

 कल्याण शीळ रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल वारंवार शंका उपस्थित केल्या आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी ५ मार्च २०२२ ला तक्रार केल्यानंतर व्हीजेटीआयने  ऑडीट केल्यानंतर ६४ ठिकाणी तडे गेलेले पॅनल दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

त्यानुसार दुरुस्तिचा काम चालू आहे. मात्र २१ किलोमीटर रस्त्याच्या गुणवत्तेविषयी आनंदी

होत्या. त्यानुसार काम चालू आहे. मात्र २१ किलोमीटर रस्त्याच्या गुणवत्तेविषयी आनंदी आनंदच आहे, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. याआधीही अनेकदा या रस्त्याविषयी राजू पाटील यांनी तक्रार केली होती. आताही त्यांनी रस्त्याच्या गुणवत्तेवर बोट ठेवलं आहे. टक्केवारीचा हॅशटॅग टाकून रस्त्याच्या कामाबाबत असलेल्या रस्ते कामातील भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी सडेतोड टिका केली आहे. सत्ताधाऱ्यांची कॉन्ट्रॅक्टरसोबत भागीदारी आहे. त्यामुळे त्याच्यावर कुणाचा अंकुश नाही असे बोलले जाते.

कल्याण-शीळ रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल तक्रार केल्यावर VJTI ने ऑडिट केल्यानंतर १० कि.मी. मधले ३० पॅनल बदली करणे व ६४ तडे गेलेले पॅनल दुरूस्त करण्याच्या सुचना दिल्या होत्या, त्यानुसार काम चालू आहे. परंतु एकंदरीतच ह्या एकुण २१ कि.मी. रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल आनंदी आनंदच आहे. #टक्के

टिप्पण्या