अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीचा हथौड़ा

केडीएमसीच्या आय प्रभाग कडून अनधिकृत बांधकामांवर तोडक धडाका सुरूच

DT न्यूज/स्वदेश मालवीय

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या  प्रभाग आय मध्ये , शेकडो ने अनधिकृत बांधकामे बांधण्यात आली आहेत,त्या मध्ये ग्राउंड प्लस फोरच्या इमारती देखील अनाधिकृतीरित्या विकासकांनी बांधल्या आहेत ,


केडीएमसी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त,यांचे निर्देशानुसार अनधिकृत बांधकाम विभाग उपायुक्त जगताप ,उपायुक्त परिमंडळ -2 च्या सौ. देशपांडे  यांच्या मार्गदर्शनानुसार आडीवली ढोकली येथे रहिवास असल्याने अंशतः कारवाई करण्यात आली,  तसेच द्वारली येथील तळ + 4 चे  अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर मात्र निष्कासनाची कारवाई करण्यांत  आली
.

दोन ब्रेकर,  ठेकेदाराचे दहा कामगार, एक पोकलन, एक जेसीबी, आय प्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण कामगार,फेरीवाला पथक कामगार यांच्या सहाय्याने आय प्रभागच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी हे धडक कारवाई केली .या सोबत महानगरपालिकेचे पोलीस अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. 

ही अनधिकृत इमारत बांधकाम धारक कमलेश दुबे यांनी बांधलेली इमारत होती..

टिप्पण्या