मु मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजिक कार्यक्रम

 कल्याण पूर्व येथे साई भक्तान कडून  सामाजिक व भांदराचा आयोजन

DT न्यूज/स्वदेश मालवीय

कल्याण : राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारचे जनताभिमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कल्याण उपशहरप्रमुख संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर विविध समाज उपयोगी आणि साई भक्त संजय शिर्के तर्फे महा भांडाराचा आयोजन  करण्यात आले होते.

कल्याण पूर्व येथील आमराई - विजय नगर, गौरी विनायक बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स कार्यालया समोर संपूर्ण दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमां अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व चेष्मे वाटप, गरजवंत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, याच बरोबर महिलांसाठी एका विशेष खेळ  कार्यक्रमा अंतर्गत लकी ड्रॉ च्या माध्यमातून ५० भाग्यवंत महिलांना आकर्षक भेट वस्तू  प्रमुख पाहुणे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले.


मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या समाज उपयोगी उपक्रमांबरोबरच सायंकाळी ७ नंतर संजय उपशहर प्रमुख संजय गायकवाड आणि शुभम गायकवाड यांनी साईबाबांची आरती केली त्या नंतर महा भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आले होते. शेकडो नागरिकांनी या साई भंडाऱ्याचा लाभ घेतला,या सामाजिक कार्यक्रमाला बहुसंख्येने नागरिक, महिलावर्ग उपस्थित होता . 


कल्याण पूर्व, विजयनगर, आमराई या परिसरातील तमाम नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेबांची शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड तसेच गौरीविनायक बिल्डर्सचे संचालक आणि उपशहर प्रमुख संजय गायकवाड, माजी  नगरसेवक देवानंद गायकवाड, शुभम गायकवाड, जयंता गायकवाड, प्रदीप गायकवाड, विश्वनाथ गायकवाड, शेळके, मॅनेजर संजय मोरे, संजय शिर्के, एडवोकेट  विक्की महिले,  डॉ. पुजा संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला होता.


या भव्यदिव्य आयोजनाबाबत कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी बाळासाहेबांची शिवसेना उप शहर प्रमुख संजय गायकवाड यांचे कौतुक केले ,त्यासोबत संजय गायकवाड शुभम गायकवाड यांनी आपलं मत व्यक्त केली.

या सीएम सोहळा निमित्ताने  गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कार्यालयासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साऊथ स्टाईल चे बॅनर झळकत होते, 

शरद शिंदे, आदिराज मीडिया ,कल्याण,

टिप्पण्या