९/आय प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर उपायुक्त व सहा.आयुक्तची कारवाही शुरुच

  म्हाप्लिकाने तोड़ले ५ अनधिकृत जोते व २ मोठ्या गोडाऊन्स

DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण : महापालिकेच्या ९/आय प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई सुरुच आहे.

महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ९/आय प्रभागाच्या* सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व नांदिवली चिंचपाडा गाव येथील जोत्याचे बांधकाम चालू असल्याची माहिती मिळताच  सदर *५ अनधिकृत जोते (foundation) व २ मोठ्या गोडाऊन्सवर* निष्कासनाची धडक कारवाई केली.

सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी यांचे मदतीने आणि १ जे.सी.बी. व ५ कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली. बांधकामधारक इमारतीच्या बांधकामाचे स्लॅब तोडण्याची धडक कारवाई केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे  इतर कर्मचारी , महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

टिप्पण्या