विद्यार्थी मित्रांनो शिकाल तर टिकाल-डॉ. मनीलाल शिंपी
आम्रपाली विद्यालयात् राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती मोठ्याने साजरा
DT न्यूज़/प्रतिनिधी
ठाणे : राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुप तर्फे कल्याण, डोंबिवली ,उल्हासनगर परिसरात १००० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, त्यापैकी कल्याण विठ्ठलवाडी येथील जेतवन उन्नती मंडळ संचलित आम्रपाली विद्यालय प्राथमिक आणि माध्यमिक या शाळेमध्ये वह्या व खाऊ वाटपाचा कार्यक्रम शुक्रवार २४ फरवरी रोजी मोठ्या उत्साहने साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मानवसेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी , दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, स्वच्छ भारत अभियान, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण पंडितराव लोंढे, आदी मान्यवर ,शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा या ऊक्ती प्रमाणे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आई वडील हेच आपले गुरु आहेत त्यानंतर शिक्षक हे आपले गुरु असतात, त्यामुळे आपल्यातील अनेक विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील, इंजिनियर, आमदार, खासदार अशा विविध क्षेत्रात पुढे जात असतात असे यावेळी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले,
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले , मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहोत , आम्ही फक्त पोस्टमनच्या भूमिकेतून काम करीत आहोत त्यामुळे कमी तेथे आम्ही असे म्हणायला वावगे ठरू नये आज प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जर ते आपण आत्मसात केले नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे,आपल्या गुरुजनांचा आदर केला पाहिजे तेव्हाच आपण आपल्यात बदल घडऊ शकतो, म्हणून शिकाल तर टीकाल असे यावेळी मार्गदर्शन करताना आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांनी सांगितले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे एन पाटील यांनी केले तर आभार दर्शन पी.पी.लोंढे यांनी केले, हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा