सराईत घरफोड्या करणारा अटक, दहा गुन्ह्यांची उकल..
घरफोड्या करणाऱ्या कडून बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत..
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
डोंबिवली: कल्याण डोंबिवली शहरांमध्ये सातत्याने घरफोड्यांचे प्रकार वाढले असून याकरिता परिमंडळ 3 यांनी स्पेशल गुन्हे अन्वेषण विभागातर्फे पथक तयार करून ,त्यात सीसीटीवी फूटेजच्या आधार घेऊन घरफोडी करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या जात आहेत
मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आविनाश वनवे, एपीआय सुनील तारमाळे, सह पोलीस उपनिरीक्षक भानुदास काटकर, पोलीस हवालदार खिलारे, गडगे ठीकेकर, पवार, पाटील यांच्या सह सर्व पथकाने द्वारली येथे राहणारा सराईत घरफोड्या शंकर भिमराव सूर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चेनाले , याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले, यामध्ये मानपाडा , विष्णूनगर आणि डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा गुन्हे उघड झाले आहेत. एकूण बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास मानपाडा पोलिसांना मोठे यश आलं आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा