महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाची वार्षिक महासभा देवगड येथे संपन्न.

 अहमदनगर जिल्हा आरएसपी युनिट तर्फे सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचे सम्मान

DT न्यूज़/स्वदेश मालविय

ठाणे: महाराष्ट्र राज्य गृह खाते (पोलीस), व शिक्षण विभाग अधिकारांतर्गत, महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन, नागपूर, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देवगड देवस्थान येथे आयोजित राज्य पदाधिकारी समन्वय समितीच्या विचार सभेत, शैक्षणिक,सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रात करीत असलेल्या सेवाभावी कार्याबद्दल, मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, यांच्यासह आर एस पी समादेशक दिलीप स्वामी,आणि डॉ.जितेंद्र सोनवणे,यांना महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाचे अध्यक्ष श्री.संजय शेंडे यांचा हस्ते  अहमदनगर जिल्ह्याच्या आर एस पी च्या वतीने "सन्मानचिन्ह" देऊन सन्मानित करण्यात आले.

             आर एस पी चे सम्मनित पदाधिकारी

 आर एस पी चे महासमादेशक पितांबर महाजन यांनी संपूर्ण वार्षिक उपक्रमांचे नियोजनाबाबत विशेष माहिती दिली, पुढील पदाधिकाऱ्यांची निवड लवकर जाहीर करण्याचे असे सांगितले.राज्य समन्वयक मधुकरराव तिडके यांनी त्यांच्या कालखंडातील संपूर्ण खर्चाच्या आवक जावक तपशील सभेपुढे सविस्तर आणि उत्कृष्टपणे मांडला त्या सर्व खर्च आणि  संपूर्ण उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्वांमती मंजुरी नगर जिल्हा परिवहन विभागातील राहुल सरोदे यांनी वाहतूक नियमांचे पालन करून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आर एस पी या विषयाची व आर एस पी अधिकाऱ्यांची प्रशासनाला मोलाची मदत होत आहे याशब्दात आर एस पी चा कार्याचे अभिनंदन आणि कौतुक केले.

 महाराष्ट्र राज्य आर एस पी चे अध्यक्ष संजय झेंडे यांनी आर एस पी विषयाच्या बाबतीत प्रशासनाकडून कंपल्सरी विषय म्हणून मागणी करणे, तसेच हा रेसिपी विषयाला देखील प्रमाणे शासनाकडून सवलती उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

आर एस पी या विषयाचे महत्व संपूर्ण महाराष्ट्रात समजण्यासाठी प्रत्येकाचे अधिकारी तसेच प्रत्येक शाळेत विषयाबद्दल प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करणार अशी बांधणी करण्यात येईल असे मनोगत व्यक्त केले.श्री. फाळके, कोकण विभागीय प्रमुख पिराजी पाटील, रायगड जिल्हा समादेशक वाघमारे सर, पुणे विभागीय समाजाच्या श्रीमती हरिभक्त मॅडम, आर एस पी चे उपाध्यक्ष संजय भैलुमे, कोल्हापूर विभाग समादेशक अनिल कुंभार, पिंपरी चिंचवड चे समादेशक विजय भस्मे, औरंगाबाद समादेशक पांडे सर, चंद्रपूर जिल्हा समादेशक कुमारी जे के मेश्राम,बीड जिल्हा समादेशक इंगोले, उपस्थित होते. या संपूर्ण महासभेचे नियोजन अहमदनगर विभागीय समादेशक  सिकंदर शेख, नगर जिल्हा समादेशक संजय बोंतले यांनी विशेष परिश्रम घेऊन सर्व मान्यवरांचे सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले.तसेच एस पी ची महाराष्ट्र राज्याची पहिली महासभा यशस्वीरित्या संपन्न झाली.

टिप्पण्या