जागा बाधितांना TDR मोबदला संबंधित केडीएमसीतील ९ /आय वॉर्डमध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
बाधित शेतकरी व आम नागरिक यांना मार्गदर्शन करणे करता मनपा ९/आय, प्रभागात कॅम्प आयोजित
DT न्यूज/स्वदेश मालवीय
कल्याण:- केडीएमसी 9/आय प्रभागात मंगळवारी आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांचे निर्देशानुसार आणि उपआयुक्त (परि -२) सौ. देशपांडे तसेच उपआयुक्त जगताप यांचे मार्गदर्शनानुसार श्रीमलंग रोड ते मौजे दावडी येथील रीजन्सी अनंतम संकुल कल्याण शिळ रस्त्यापर्यंत 24.00 मीटर रस्ता..
मोजे दावडी तर्फे अंबरनाथ येथील शिळ रोड ते दावडी गाव येथील 30.00 मीटर रस्ता रुंदीकरणातील बाधित भूखंड धारकांना TDR संबंधित तसेच किती जागा बाधित होत आहे या *बाबत मार्गदर्शन व्हावे अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने केडीएमसी आयुक्त दांगडे यांचे निर्देशानुसार नवीन रस्ता बांधताना बाधित होणाऱ्या लाभार्थ्यांना शेतकरी यांना मार्गदर्शन करणे करता 9/आय, प्रभागात कॅम्प आयोजित करण्यात आला .
.शिविरच्या शेवटी बाधित वर्ग तर्फे समितीचे पदाधिकारी तुळशीराम म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका तर्फे असच सहकार्य मिळण्याची अपेक्षा करीत आभार प्रकट केले .



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा