विद्यार्थीयांना त्रास नको म्हणून कुठला ही धूमधड़ाका नको

 परीक्षा विद्यार्थीयांना त्रास नको म्हणून रुपेश भोईर ह्यांनी वाढ दिवस साधारण पणे केला साजरा 

DT न्यूज़/स्वदेश मालविय

कल्याण - सध्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरु असून मी माझा वाढ दिवस साधारण पद्धतीने साजरा करण्याची सल्ला माझ्या हितचिंतकांना दिली होती . आणि त्या सर्वानी ते मान्य करून कुठला ही धूमधडाका ना करता , माझ्या वाढ दिवसा निमित्त मला घरी येऊन शुभकामना दिल्या .

 त्या बद्दल मी सर्वांचा आभार मानतो , असे उदगार मनसे चे कल्याण शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईर ह्यांनी व्यक्त केले आहेत . 

प्रत्येक वर्षी अकरा मार्च रोजी रुपेश भोईर ह्यांच्या वाढ दिवसानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम यंगस्टर यूथ फाऊंडेशन च्या वतीने साजरे केले जातात पण ह्या वर्षी मुलांची  वार्षिक परीक्षा असल्या मुळे कुठला ही गोंगाट ना करता साध्या पद्धतीने वाढ दिवस साजरा करण्यात आला . 


अकरा मार्च रोजी संध्याकाळी रुपेश भोईर ह्यांनी आपला मित्र मंडळी सोबत कल्याण येथील डम्पिंग ग्राउंड स्लम एरियात जाऊन तिथे कचरा विणणाऱ्या मुलांना नाश्त्याचे पाकिट देऊन त्यांच्या सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला .

टिप्पण्या