महापालिकेच्या ९/आय प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
आडवली ढोकली येथील तळ + ४ मजली इमारतीच्या महानगरपालिका तर्फे कारवाई
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण:-महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली *९/आय प्रभागाच्या* सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आडवली ढोकली येथील चाळीस एकर परिसरातील कोहिनूर प्रोजेक्टच्या बाजूला असलेल्या *बांधकामधारक नितीन चिकनकर* यांच्या *तळ + ४ मजली इमारतीच्या स्लॅब बांधकामावर* निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली.
इमारतीच्या स्लॅब बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज दिवसभरात केली.
सदर कारवाई कड़ोमपा च्या अंतर्गत अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि २ काँक्रीट ब्रेकर व १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा