फ्लॅट धारकांना जप्तीची नोटीस काढलेली रद्द करण्याची अमदार राजू पाटिल यांची मागणी
पलावा एकात्मिकृत नगर वसाहती असूनही शासन निर्णयाप्रमाणे मालमत्ता धारकांना सवलत मिळत नाही :- राजू पाटील
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण: पलावा शासन मान्यता प्राप्त एकात्मिकृत नगर वसाहती असूनही शासन निर्णयाप्रमाणे मालमत्ता धारकांना करामध्ये सवलत मिळत नसल्याबाबत आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांची भेट घेऊन फ्लॅट धारकांना जप्तीची नोटीस काढलेली रद्द करण्याची मागणी आमदार राजू पाटील यानी आज आयुक्तनकडे केली आहे.
पलावा मधील गोल्फलिंक, कासावेला, कासाबेला गोल्ड व कासारिओ येथील मालमत्ता धारकांना Inergrated Township नियमानुसार ६६% कर सवलत मिळावी यासाठी पत्रव्यवहार करून कळवले होते मात्र यावर काहीही निर्णय झाला नाही .या बाबति पुढे काय म्हणाले आमदार ऐकूउया...
आमदार राजू पाटीलकल्याण डोंबिवली महापालिका कर विभागाकडून पलावा मधील कर सवलतीबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु कर सवलत देणे बांधनकारक असतानाही सध्या मनपाकडून पलावा मधील मालमत्ताधारकांना कर थकीत आल्याने कल्याण डोंबिवली महापालिका कर विभागाने जप्तीचे वारंट" काढण्याले आहे.
हा नियम आयुक्तांना माहिती असून आयुक्त
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना भिवंडी व कल्याण तालुक्यातील Inergrated Township नुसार सवलत दिलेलो आहे. हीच तरतुद कल्याण डोंबिवली महानगरपालिकामधील पलावा सिटीसाठीही लागू होते याची कल्पना आयुक्तांना आहे.
त्यामुळे याबाबत आपण तातडीने निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु पलावावासियांना अन्यायकारक नोटीसा काढण्यात आल्या आहेत हे दुर्दैवी आहे..
पलावामधील मालमत्ताधारकांना कर वसुलीबाबत दिलेल्या "जप्ती वॉरंट" नोटीसांना स्थगिती द्यावी व Inergrated Township नियमानुसार ६६% कर सवलत देऊन पुनर्मुल्यांकन करून कर आकारणी करावी अशी मागनी आमदार राजू पाटील आयुक्तांना केली

.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा