महापालिकेच्या "४/जे" "६/फ" व "९/आय" प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरूच

कल्याण डोम्बिवली महापालिका आयुक्त  यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली 3 सहा. आयुक्त प्रभागत धडक कारवाई

DT न्यूज़/स्वदेश मालविय

महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली  सहा. आयुक्त सविता हिले यांनी ४/जे प्रभागातील कचोरे  येथील प्रस्तावित  ९० फूट डी. पी. रस्त्यात असणाऱ्या १ पत्राचे गोडाऊन व १ टपरीवर जे .सी.बी. च्या  सहाय्याने निष्कासनाची कारवाई केली. सदर कारवाई फेरीवाला पथकातील  कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली

 "६/फ"प्रभागाचे सहा. आयुक्त भरत पाटील यांनी डोंबिवली पूर्व खंबाळपाडा भोईरवाडी येथील जमीन मालक चिंतामण जनार्दन पाटील व बांधकाम धारक आकाश अंबिका प्रसाद सिंह यांच्या चालू असलेल्या तळ+७ इमारतीच्या स्लॅब व भिंतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई  काल दिवसभरात केली.

सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिक्षक जयवंत चौधरी व इतर कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जेसीबी, ३ ब्रेकर, २ गॅस कटर व १० कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.

त्याचप्रमाणे *"९/आय"* प्रभागातही सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आडिवली, ढोकली येथील कोहिनूर प्रोजेक्टच्या बाजूला असलेल्या, बांधकामधारक कुणाल पाटील यांच्या तळ+३ अनधिकृत इमारतीच्या स्लॅब बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई काल सुरू केली.

सदर कारवाई अनधिकृत बांधकाम विभाग व फेरीवाला हटाव कर्मचारी, महापालिका पोलीस कर्मचारी, मानपाडा स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने व १ पोकलेन, २ कॉम्प्रेसर व १० मजूर यांच्या साहाय्याने करण्यात येत आहे.

टिप्पण्या