केडीएमसी प्रभाग "९/आय" दावडी मधील अनधिकृत इमारतीवर कारवाई

प्रभाग ९/ आयच्या सहाय्यक आयुक्त  हेमा मुंबरकर यांची धडक कारवाई...


DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण: -कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली *"९/आय"* प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी डोंबिवली पूर्व दावडी येथील अनधिकृत बांधकामधारक ललित महाजन यांच्या तळ + ८ मजली अनधिकृत इमारतीच्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई शुक्रवारी सुरू केली

या कारवाई अनधिकृत बांधकाम विभाग, फेरीवाला हटाव कर्मचारी व महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने व १ जे.सी.बी., १० कामगार यांच्या साहाय्याने करण्यात येत आहे.

"९/आय" प्रभागाच्या सहा.आयुक्त
 यांचा नेतृत्वतात कारवाई

महापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी यांच्या सहाय्याने केली. सदर कारवाई यापुढेही सुरू रहाणार आहे.असे आयुक्तांचे आदेश आहे.

टिप्पण्या