डोंबिवली पोलीसांनी १,३०,०००/-रुपये किमतीच्या १३ सायकल हस्तगत केल्या

 सायकल चोरी करणा-या एका आरोपी व बालकांकडुन कीमती सायकल हस्तगत 

DT न्यूज़/स्वदेश मालवीय

डोबिवली: डोबिवली पोलीस ठाणे हददीतील नंदादीप सोसायटी, जय मिलन सोसायटी रोड, गणेश प्रतिभा सोसायटी आयरे रोड, विवेक सोसायटी आयरे रोड पूर्व परीसरात सायकल चोरी झाल्याबाबतच्या कारीडोंबिवली पोलीस ठाणे दाखल असल्याने सदर आरोपीत है ज्या मार्गाने येतात त्या मार्गावर पाळत ठेवून दिनांक ०४ मार्च  रोजी पहाटे ३.३० वा सुमारास त्यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यातील एक विधीसंघर्षग्रस्त बालक मिळुन आल्याने त्यास त्यांचे पालकांच्या ताब्यात देवुन, आरोपी नामे हसमितसिंग जसमेरसिंग सैनी वय १९ वर्षे रा. गणेशनगर दिवा पुर्व याचेकडुन एकुण १३ सायकल पोलिसांना मिळाली आहे.

सदर गुन्हयातील फरार आरोपीताचा शोध डोबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि सानप, सपोनि भराडे, पोहवा -५०३/ बाप, पोवा १९२४ भणगे, पोहवा-३७१२/ भालेराव, पोहवा ५२००/ लोखंडे, पोना/७०९२/ कोळेकर पोस ३४०६ / राठोड पो अ २४३८ / ठाकुर हे करीत असताना त्यांनी नमुद गुन्हयाचे घटनास्थळाचे आजूबाजुचे सीसीटीव्ही पाहणी करून सीसीटीव्ही च्या आधारे दोन संशयीत अनोळखी आरोपीत हे सायकल चोरी करुन जात असताना दिसुन आल्याने .

 हिरो स्पॉट, डिकॅथलॉन, कॉस एक्सीड, कॉस्मीक वायझर, अँवॉन, हरक्युलस, बिटविन वोकी  अशा कंपनीच्या एकुण किंमत :- १,३०,००० /- रुपये किंमतीच्या सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

 वरील जप्त सायकलचा अभिलेख तपासला असता डोम्बिवालित 4 गुन्हे उघडकीस करणायात आले आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३, कल्याण सचिन गुंजाळ , सहाय्यक पोलीस आयुक्त; डोंबिवली विभाग  सुनिल कुराडे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सचिन सांडभोर; पोनि / तडवी, यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप सपोनि बळवंत भराडे; पोहवा विशाल वाघ; पोहवा भणगे; पोहवा- सचिन भालेराव; पोहवा लोखंडे; पोना. कोळेकर; पोअ  राठोड, चालक पो. अंपो.ना. कोती; पो.ना रायते ; पो.अ. निलेश पाटील; पोअ गिरीश शिर्के यानी कामगीरी केली आहे.

टिप्पण्या