एशियातले सर्वात मोठे पिकल बॉल स्टेडियम डोंबिवलीत
एशियातले सर्वात मोठे पिकल बॉल स्टेडियम आपल्या डोंबिवली मध्ये याचा अभिमान वाटतोय - अभिनेते भाऊ कदम.
DT न्यूज़/स्वदेश मालवीयडोम्बिवली : कमी अवधित जगप्रसिद्ध झालेला खेळ कल्याण डोंबिवली करांना देखील खेळता यावा आणि येणाऱ्या ऑलिंपिक मध्ये इथला खेळाडू असावा या उद्देशाने डावखर फाउंडेशन आणि रिजन्सी ग्रुप यांनी बेलग्रेव स्टेडियम सुरू केले आहे. ज्यामध्ये आठ कोर्ट चार पॅवेलिअन्स असणार आहेत. या स्टेडियमचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
रीजन्सी ग्रुपचे महेश अग्रवाल, संजय गोयल, अनिल भतीजा, विकी रूपचंदाणी, दिनेश कुमार बासोरिया उपस्थित होते. तसेच माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर आणि माजी नगरसेवक सचिन पोटे देखील उदघाटन च्या वेळी उपस्थित होते.
आजची जीवनशैली पाहता निरोगी राहण्यासाठी आणि चपळता वाढवण्यासाठी पिकल बॉल हा खेळ आवर्जून खेळला जातो. उदघाटनाच्या दिवशी डावखर कप 2023 च आयोजन करण्यात आले होते. ज्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, झारखंड मधून खेळाडू या ठिकाणी टूर्नामेंट साठी आले होते. डावखर कप 2023 मध्ये एकूण एक लाख 25 हजार रुपयांची रोख बक्षिसे आणि मेडल विजेत्या स्पर्धकाला देण्यात आले.
अभिनेते भाऊ कदमओपन मेन्स सिंगल मध्ये अनुक्रमे कुलदीप महाजन गौरव राणे हिमांश मेहता, ओपन मेन्स डबल मध्ये अनुक्रमे तेजस मयूर, वंशिक रोनव, गौरव हिमांश आणि 35 प्लस मेन्स डबल मध्ये अनुक्रमे मिहीर हिमांशु, वैभव विकी, संदीप शैलेश यांना प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक मिळाले. सानिया मिरझा विरुद्ध टेनिस खेळणारी नॅशनल खेळाडू ईशा लखानी व हिमांश मेहताआणि नॅशनल पिकल बॉल खेळाडू नैमी मेहता व हर्ष मेहता देखील उपस्थित होते. तसेच ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन अध्यक्ष अरविंद प्रभू हे देखील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आले होते.
एशियातल्या सर्वात मोठ्या पिकल बॉल स्टेडियम उद्घाटनाचे सूत्रसंचालनकलाकार प्रणव भांबुरे यांनी केले. संतोष डावखर आणि टीमने विशेष मेहनत घेऊन उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वी केला.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा