अनधिकृत बांधकामांवर केडीएमसी ची तोडक कारवाई
१/अ" व "९/आय" प्रभागात अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई सुरूच
DT न्यूज/स्वदेश मालवीय
महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली *"१/अ"* प्रभागाचे सहा. आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी टिटवाळा इंदिरा नगर येथील आरक्षित भूखंडावरील सुरू असलेल्या चाळीच्या (एकुण ६ खोल्या) बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचाऱ्यांनी घणाच्या साहाय्याने केली.
बांधकामांत्याचप्रमाणे *"९/आय"* प्रभागातही सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आडिवली, पिसवली गाव येथील सुरू असलेल्या २ चाळींच्या (एकुण १५ खोल्या) बांधकामांवर, ५ अनधिकृत जोते (foundation) तसेच ५ गोडाऊन्सवर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम विभाग व फेरीवाला हटाव कर्मचारी यांच्या मदतीने व १ जे.सी.बी., ५ कामगार यांच्या साहाय्याने करण्यात आली.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा