महापालिकेच्या '७/ह' व '९/आय' प्रभागातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई सुरुच

 कल्याण डोंबिवलीतील ७/ह' व '९/आय' प्रभागातील सहा. आयुक्तांचे धड़क कारवाई

DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण: महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार ७/ह' व '९/आय' प्रभागातील सहा. आयुक्तांचे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई सुरुच आहे.

आयुक्त व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली "७/ह"प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी डोंबिवली पश्चिम देवी चौक, नुपुर हॉल समोरील बांधकामधारक गौरव सामंत यांच्या तळ + ६ मजली अनधिकृत इमारतीच्या  बांधकामाचे स्लॅब निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात  केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिक्षक अरुण पाटील व इतर कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि ४ काँक्रीट ब्रेकर व १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.


तसेच "९/आय"प्रभागातही सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आडवली ढोकली येथील बांधकामधारक संजय सिंग यांच्या तळ + ४ मजली अनधिकृत इमारतीच्या  बांधकामाचे स्लॅब निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात  केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि २ काँक्रीट ब्रेकर व १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

टिप्पण्या