क्रीडा शिक्षक अविनाश नलावडे ३० वर्ष प्रदीर्घ सेवेतुन निवृत्त
मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अविनाश नलावडे सर सेवा निवृत्त
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण: शुक्रवार दि.३१ मार्च २०२३ रोजी मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अविनाश नलावडे सर हे नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले.विद्यालयात जवळजवळ ३० वर्ष प्रदीर्घ सेवा करत असताना कला,क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी योगदान दिले.
अनेक खेळाडू जिल्हा, विभाग,राज्य,आणि राष्ट्रीय पातळीवर घडविले.सेवा पूर्ती सोहळ्यास गोपाळ लांडगे .नगरसेवका सौ मधुरीताई प्रशांत काळे, शिवसेना विधानसभा समन्वयक प्रशांत काळे, ज्येष्ठ नगरसेवक विशाल पावसे, नगरसेवक महेश गायकवाड,जरीमरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दळवी सर, सौ.दळवी मॅडम,मुख्याध्यापक देशमुख सर,तेली सर, आहेर सर व अनेक विद्यार्थी उपस्थित राहून नलावडे सराना सेवा पूर्तीच्या शुभेच्छा दिल्या.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा