कल्याण डोंबिवली महानगरपालिका, अनधिकृत बांधकामांवर विशेष डोळे
महापालिकाने पुनः "९/आय" प्रभागात अनधिकृत बांधकामांवर केली कारवाई
DT न्यूज़/स्वदेश मालवीय
कल्याण:कल्याण डोंबिवली महानगरपालिका, अनधिकृत बांधकामांवर विशेष डोळे ठवाली असून, महापालिकेच्या "९/आय" प्रभागात अनधिकृत होत असून पुनः सम्बंधित अधिकारी यानी बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई केली आहे .
महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली "९/आय" प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आडीवली, ढोकली गाव येथील सुरू असलेल्या अनधिकृत चाळीच्या (१३ रुम), *३ टपऱ्या* आणि *८ जोत्यांवर (फाउंडेशन)* निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली.
सदर कारवाई अनधिकृत बांधकाम विभाग व फेरीवाला हटाव कर्मचारी यांच्या मदतीने व १ जेसीबी व ५ कामगार यांच्या साहाय्याने करण्यात आली.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा