२०१४ चे जे फेरीवाले आहेत त्यांना १५० मीटर अंतर सोडून बसण्याची मुभा : आ राजू पाटील
फेरीवाल्यांच्या संदर्भात धोरण एका महिन्याच्या आत स्पष्ट केलं जाणार
मनसे आमदार राजू पाटील यांची प्रशासनासोबत बैठक
DT न्यूज़/स्वदेश मालविय
कल्याण : न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या प्रश्नी मनसेचे आमदार राजू पाटील यानी आंदोलन हाती घेतले होते. मनसेच्या इशाऱ्यानंतर केडीएमसीने तातडीने फेरीवाले हटवले देखील होते. मात्र शासनाच्या धोरणाप्रमाणे १५० मीटर पासून इतरत्र बसणाऱ्या फेरीवाल्यांसाठी महापालिकेने धोरण तयार करून त्यांना तातडीने जागा नेमून देऊन त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी आयुक्तांनी देखील तातडीने १५० मीटर पुढील फेरीवाल्यांचे नागरिकांना त्रास होणार नाही अश्या ठिकाणी बसून धोरण जाहीर होणार नाही तो पर्यंत बसण्याची मुभा बैठकीत दिली आहे.
कल्याण डोंबिवली मधील फेरीवाला प्रश्नामुळे नागरिक हैराण झाले होते. या नंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आणि फेरीवाले आता दिसेनासे झाले आहेत. मात्र या फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी गुरुवारी संबंधित सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. यावेळी फडके रोड आणि मानपाडा रस्त्यावर असलेल्या फुटपाथ वरील झालेली अतिक्रमण तातडीने जमीनदोस्त करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात असलेली महापालिकेची चिमणी गल्ली मधील पार्किंग प्लाझा रिक्षाचालकांना रिक्षा पार्किंगसाठी मोफत देण्यात येणार आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात दोन रिक्षा स्टँडला परवानगी देणार आणि तेथून पहिल्यांदाच रिक्षा या डोंबिवली शहरात मीटर प्रमाणे सुरु होणार आहेत. कल्याण डोंबिवली मधील फेरीवाल्यांच्या संदर्भात एका महिन्याच्या आत फेरीवाला धोरण स्पष्ट केलं जाईल असं आयुक्तांनी बैठकीत सांगितले आहे.
मनसे आमदार राजू पाटीलमात्र तो पर्यंत २०१४ मध्ये सर्वेक्षणात जे फेरीवाले आहेत त्यांना १५० मीटर अंतर सोडून बसण्याची मुभा दिली जाणार आहे. या बैठकीला केडीएमसीचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांडगे,अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे,प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी,वाहतूक पोलीस,स्थानिक पोलीस अधिकारी, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर,डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांसह महाराष्ट्र सैनिक देखील उपस्थित होते.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा