*महापालिकेच्या "९/आय" प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !*

 क डों मपा,अंतर्गत"९/आय"प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर पुनः अंकुश लावण्याच्या प्रयत्न

DT न्यूज/स्वदेश मालवीय

कल्याण:कल्याण डोंबिवली महानगरपालिका, अंतर्गत"९/आय"प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर पुनः अंकुश लावण्याच्या प्रयत्न कायम आहे. महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली "९/आय" प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी *नेवाळी नाका, मलंग रोड येथील ३ अनधिकृत गाळे, ५ टप-या,  ५ जोते (foundation) व चाळीच्या (एकूण ९ रुम) बांधकामावर* निष्कासनाची धडक कारवाई १३ मई २०२३ चे दिवसभरात केली.


*सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व फेरीवाला हटाव पथक कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी.बी., ५ कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.*

टिप्पण्या