महानगरपालिका हद्दीत आडीवली ढोकली येथील अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाही
महापालिकेच्या “९/आय” प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई
DT न्यूज/स्वदेश मालवीय
कल्याण : महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “९/आय” प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आडीवली ढोकली येथील *बांधकामधारक सुनील मेवाती यांच्या तळ + ४ मजली अनधिकृत इमारतीच्या स्लॅब बांधकामावर* निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली.
तसेच चिंचपाडा येथील *१ रुम आणि १ गाळ्याच्या अनधिकृत बांधकामावर* निष्कासनाची कारवाई केली. *सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व फेरीवाला हटाव पथक कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी.बी., ५ कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा