महापालिकेच्या "४/जे", "६/फ" व "७/ह" प्रभागातील अतिधोकादायक इमारतींवर कारवाई

कडोमनपाच्या ३ प्रभागातील अनाधिकृत अतिधोकादायक बांधकामावर हथोडाची कारवाई 

DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण: २८ मई २०२३कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या तीन प्रभागातील ४/जे", "६/फ" व "७/ह" मधे सम्बंधित अधिकारियां सोबत अनिधिकृत व अतिधोकादायक इमारतींच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली "४/जे" प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले यांनी गणेशवाडी येथील तळ + २ मजली 'बोरसे बिल्डिंग' या अतिधोकायक इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली.सदर कारवाई फेरीवाला हटाव पथक कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने  करण्यात आली परंतू इमारतीच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती असल्यामुळे ही कारवाई मनुष्य बळाने  करण्यात आली.

६/फ प्रभागात सहा.आयुक्त भरत पाटील यांनी डोंबिवली पूर्व व्ही.पी. रोड, *अचलकर कंपाऊंड येथील "पंपा सदन" या या अतिधोकायक इमारतीच्या बांधकामावर* निष्कासनाची  कारवाई  केली. सदर कारवाई पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आली त्याचप्रमाणे पाथर्ली येथील "श्री कृपा" या अतिधोकायक इमारतीच्या बांधकामावर* निष्कासनाची  कारवाई करण्यात आली. इमारतीच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती असल्यामुळे सदर कारवाई मनुष्य बळाने  करण्यात आली.

त्याचप्रमाणे ७/ह प्रभागाचे सहा.आयुक्त सुहास गुप्ते यांनी डोंबिवली पश्चिम येथील तळ + २ "अर्जुनदीप" या अतिधोकायक इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई केली. सदर इमारतीमध्ये नागरिक राहत नव्हते परंतु व्यवसायिक सदनिका/ व्यावसायिक गाळे सुरू होते. सदर गाळेधारकांना भोगवटा  प्रमाणपत्र देण्यात आले व इमारत निष्कासित करण्यात आली.सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिक्षक अरुण पाटील व इतर कर्मचारी,  महानगरपालिकेचे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ पोकलेन व १ जे.सी.बी. यांच्या सहाय्याने करण्यात आली.

टिप्पण्या