महापालिकेच्या "२/ब" प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई सुरुच

 कल्याण डोंबिवली महानगर पालिकाची अनधिकृत बांधकामांवर विशेष डोळे ;तोड़क कारवाई 


DT न्यूज़/स्वदेश मालवीय

कल्याण: महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली "२/ब" प्रभागाचे सहा. आयुक्त राजेश सावंत यांनी कल्याण प. खडकपाडा पोलीस स्टेशन समोरील देसाईकर यांच्या एकुण १९ अनधिकृत व्यावसायिक गाळ्यांवर निष्कासनाची कारवाई केली.  


तसेच कल्याण प. येथील स्मार्ट सिटी तर्फे तयार करण्यात येणाऱ्या "रोनक सिटी ते ट्री हाऊस शाळा पर्यंतच्या"*  रस्त्यात बाधा ठरणाऱ्या 'ट्री हाऊस शाळेची कंपाऊंड भिंत'* आणि *'बाजूच्या सोसायटीची कंपाऊंड भिंत यावर'* निष्कासनाची धडक कारवाई  केली. 


सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जेसीबी व १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

टिप्पण्या