जितेंद्र आव्हाड यांनी पुढे पुन्हा असं वक्तव्य केलं तर रस्त्यावर उतरू ; शिवसेना शिंदे गटाकडून इशारा

 आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतोय जितेंद्र आव्हाड: राजेश कदम


DT न्यूज/स्वदेश मालवीय

डोंबिवली - दिघे साहेबांची सणसणीत कानाखाली खाल्लेला जितेंद्र आव्हाड आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतोय …त्यामुळेच आव्हाड यांनी शरद पवार यांच्यामुळे आनंद दिघेची जेल मधून सुटका झाली ..अहो दगाबाज कोण? काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीे कोणी केली..?असे प्रश्न करत, विधान केल्याचा आरोप शिवसेना उपिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केला .

डोंबिवली शिवसेना शहर शाखा कार्यालयात पत्रकार परिषदेच्या आयोजन करण्यात आले होते .यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यचा निषेध शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.. पहा काय म्हणाले.

जितेंद्र आवड यांनी एका सभेमध्ये बोलताना शरद पवार यांच्यामुळेच आनंद दिघे यांचे टाडातून सुटका झाली असं विधान केलं होतं .याबाबत बोलताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड.यांच्यावर जोरदार टीका केली .

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शिल्लक सेना असा उल्लेख करत धर्मवीर आनंद दिघे यांचे शिकवण तुम्ही सोडली ..मुस्लिम धार्जिने जिथे धर्मच राजकारण करतात अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही राजकारण करता, कुठेतरी तुम्ही लाज बाळगले पाहिजे तुम्ही जाहीर निषेध करा असा आव्हान देखील उद्धव ठाकरे गटाला यावेळी करण्यात आलं.तसेच जितेंद्र आव्हाड यांनी इथून पुढे पुन्हा असं वक्तव्य केलं रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील शिवसेना शिंदे गटाकडून दिला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे शिवसेना पदाधिकारी पंढरीनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पण्या