नातेवाईकांनी जबरदस्ती कब्जा करत घर बळकवल्याचा धक्कादायक प्रकार

 बदलापूर येथे एका दंपत्ती यांनी घराबाहेर केले घर मालकाला


DT न्यूज/प्रतिनिधी

बदलापूर : बदलापूर हेंद्रेपाडा परिसरामध्ये एका वयोवृद्ध भाऊ बहिण त्यांच्या नातेवाईकांनीच घर बळकवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

गेल्या पाच वर्षा आधी सिताराम गाडे यांनी बदलापूर हेंद्रपाडा परिसरामध्ये असणाऱ्या वाडीलाल इमारतीमध्ये फ्लॅट विकत घेतला होता. हे त्यांचे मालकी हक्काचे घर असून त्यांच्या लहान भावाच्या लग्नानंतर त्यांची राहायची सोय नसल्याने त्यांनी हे घर त्यांच्या लहान भावाला तात्पुरते राहण्यास दिले होते . परंतु घरात तो लहान भाऊ राजेंद्र गाडे (५०) आणि त्यांची पत्नी अंशू गाडे यांची किरकोल कारणावरून भांडण होत होती.पहा सविस्तर काय म्हणाले बाहेर बसले मोठे भाऊ सीताराम याने .

                  मोठा भाऊ सिताराम गाडे 
या भांडणाचे रूपांतर घटस्फोटामध्ये होत असताना मोठा भाऊ सिताराम गाडे (वय ६५) यांनी त्यांच्या लहान भाऊ राजेंद्र याला व त्यांच्या पत्नीला सदनीका खाली करून देण्याची विनंती केली असता भावाने होकार दिला परंतु पत्नी अंशू याने हट्ट करून सदनिकेत थांबली आणि उलट घरमालक अर्थात मोठ्या भावाला “तुम्हाला जे करायचे ते करा मी घर सोडून जाणार नाही ” अशी धमकी दिली.
                  दीपा गांगुर्डे समाजसेविका

 त्यामुळे घरमालक सिताराम गाडे आणि त्यांच्या पत्नीने समाजसेविका दीपा गांगुर्डे यांच्याकडे धाव घेतली.

 यावर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता, काही राजकीय दबाव मुळे पोलिसांनी त्यांना सहकार्य केले नसल्याचे सांगण्यात आले . 

टिप्पण्या