महापालिकेच्या ९/आय प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरुच
नेवाळी नाका, डावलपाडा, वसार, व्दारलीपाडा येथील गाळे, टप-या व अनधिकृत जोते बांधकामावर मनपाची कार्यवाई
DT न्यूज/स्वदेश मालवीय
कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ९/आय प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी नेवाळी नाका, डावलपाडा, वसार, व्दारलीपाडा या परिसरात येथील चालु असलेल्या अनधिकृत जोते (Foundation) बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई करणार आली.
येथे ३ चाळीमधील ९ रुम, २ गाळे, ४ टप-या आणि ५ जोते (Foundation) बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात करण्यात आली.
सदर कारवाई महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व फेरीवाला पथकातील कर्मचारी यांच्या मदती ने आणि १ जेसीबी, घण हातोडा व १० कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा