कल्याण डोंबिवली महापालिकेच्या "९/आय" प्रभागात अनधिकृत बांधकामांवर पुनः धडक कारवाई

महापालिकेच्या अंतर्गत भाल येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई

DT न्यूज/स्वदेश मालवीय


कल्याण: महापालिकेच्या "९/आय" प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली आहे.यात 10रूम आणि 2 जोते निष्कासित करण्यात आले.

महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली "९/आय" प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी भाल, डावलपाडा गाव येथील चालू असलेले अनधिकृत चाळीचे (एकूण १० रुम) बांधकामावर तसेच २ जोते (foundation)* यांवर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली.


सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व फेरीवाला हटाव पथक कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी.बी., ५ कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.

त्याचप्रमाणे १/ अ प्रभागाचे सहा. आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी बल्ल्याणी येथील अनधिकृत गोठा निष्कासित करण्याची कारवाई काल केली.

टिप्पण्या