रामबाग येथील संग्राम बिल्डींगावर क डों मपा सहा आयुक्त यांनी केली धडक कारवाई

 महापालिकेच्या २/ब प्रभागातील अतिधोकादायक इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई 


DT न्यूज/स्वदेश मालवीय

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर्फे अनधिकृत बांधकाम निष्काशीत करण्याचं काम सतत सुरूच आहे या क्रम मध्ये सध्या प्रभाग २/ब येथील अति धोकादायक इमारत सहायक आयुक्त राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली निष्काशीत करण्यात आली आहे.

   १४ जुळाई २०२३ रोजी महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार २/ब प्रभागाचे सहा. आयुक्त राजेश सावंत यांनी कल्याण (पश्चिम) रामबाग येथील *"संग्राम बिल्डींग" या तळ + २ मजली अतिधोकादायक इमारतीच्या बांधकामावर* निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली. सदर इमारत सुमारे ५० वर्षे जुनी होती. सदर इमारतीस नोटीसही बजाविण्यात आली होती.

तर ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ पोकलेन व १० कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.

टिप्पण्या