महापालिका आयुक्त यांचे निर्देशानुसार चिंचपाडा गावात अनधिकृत बांधकामावर कारवाई

 महापालिकेच्या "९/आय" प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई सुरुच


DT न्यूज/स्वदेश मालवीय

कल्याण:कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार "९/आय" प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी *चिंचपाडा गाव येथील परिसरात चाळीचे अर्धवट स्थितीत असलेले अनधिकृत निदर्शनात आल्या बरोबर एकूण १० रुम असलेला बांधकामावर आणि ८ अनाधिकृत जोते (foundation)* यांवर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली.

सदर कारवाई कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व फेरीवाला हटाव पथक कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी.बी., कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.

टिप्पण्या