डोंबिवली एमआयडीसी मध्ये केडीएमटी बस वर झाड पडले.

 केडीएमटी बस वर झाड पडल्याने 4 तास बत्ती गुल्ल

DT न्यूज

DT न्यूज/राजू नलावडे

    कल्याण: डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील शेवटचा बस स्टॉप जवळ उभ्या असलेल्या केडीएमटी बस वर आज सकाळचया सुमारास एक गुलमोहरचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच सदर झाडाच्या फांद्या महावितरणच्या उच्च दाबाच्या वाहिन्यावर पडल्याने निवासी भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. आता अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले असून त्यानंतर रस्ता मोकळा करण्यात येईल. सुदैवाने सदर उभ्या असलेल्या बस मध्ये प्रवासी नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र बसचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


 एमआयडीसी भागात अशी गुलमोहर झाडे रस्त्यांचा कडेला आहेत त्यांचे सर्वेक्षण करून जर धोकादायक असलेल्या झाडांच्या मोठ्या फांद्या तोडण्यात याव्यात जेणेकरून भविष्यात मोठे नुकसान होणाची शक्यता  नाही होणार . महावितरण कडून पावसाळ्यापूर्वी उच्च दाबाच्या वाहिन्याजवळ आलेल्या फांद्या तोडण्यात येतात त्यासाठी विशेष मोठा शट डाऊन घेत असतात परंतु आजही अनेक  झाडांच्या फांद्या या उच्च दाबाच्या वाहिन्याना स्पर्श करीत असल्याचे दिसत आहे. यामुळे एमआयडीसी भागात सतत वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत. आज याच कारणामुळे मागील दोन तासापासून एमआयडीसी मध्ये वीज पुरवठा अद्याप चालू झाला नाही आहे.

टिप्पण्या