कल्याणच्या दहीहंड्या ठरल्या लक्षवेध...

 कल्याण डोंबिवलीत राजकीय दहीहंड्या ठरल्या चर्चाचे विशेष 


D
T न्यूज/स्वदेश मालवीय

कल्याण - कल्याण डोंबिवलीतील विविध पक्षा तर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यात दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पण शिंदे आणि ठाकरे गटामधील दहिहंडी उभारण्याचा वाद उच्च न्यायालयात गेला होता. या वादावर बुधवारी  न्यायालयात सुनावणी पार पडली  त्यावेळी ठाकरे गटानेही शिवसेना शहर शाखेपासून जवळच दहिहंडी उभारावी अशी सूचना होती . छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गटाला दहिहंडी उभारण्याची परवानगी उच्च न्यायालयाने कायम ठेवली.


कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकात शिंदे गटाने दहीहंडी उभारली होती. तर हाकेच्या अंतरावर विपरीत दिशेला ठाकरे गटाने एकनिष्ठतेची दहिहंडी उभारली होती. शिंदे गटाच्या दहिहंडीला शहर प्रमुख रवि पाटील, सुनील वायले आदी पदाधिकारी उपस्थित होते. सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाना त्यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे वाटप करण्यात आली. तर ठाकरे गटाच्या दहिहंडीच्या ठिकाणी शिवसेना नेते बाळ हरदास आणि शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह रविंद्र कपोते आणि  इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण पूर्वेतील आढीवली ढोकलीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी कुणाल पाटील फाऊंडेशनच्या वतीने भव्य दहिहंडीचे आयोजन केले  होते.


कल्याण पूर्व परिसरातील गावदेवी परिसरात भाजपचे कल्याण पूर्व मंडळ संजय मोरे यांनी "नमो दहिहंडी" उभारली होती. या वेळी आमदार गणपत गायकवाड , ही उपस्थित होते. 

भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांच्या पुढाकाराने आणि भारतीय जनता पार्टी व ओम गणपती मित्र मंडळाच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन डोंबिवली पश्चिमेला करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवात कल्याण डोंबिवली, ठाण्यासह मुंबईच्या गोविंदा पथकांनी हजेरी लावत सलामी दिली.


याठिकाणी सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात येत होता. येथील हंडी फोडणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या गोविंदा पथकाला प्रत्येकी २२ हजार २२२ रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या उत्सवात मनोरंजनासाठी मराठी कलाकारांच्या ऑर्केस्ट्राचे देखील करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक शैलेश धात्रक, नगरसेविका मनीषा धात्रक, युवा नेतृत्व पूजा धात्रक यांच्यासह इतर अनेक मान्यवर, भाजप कार्यकरत्यांनी उपस्थित होते.

डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसरातील बाजीप्रभू चौकात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली. यात दुपार पर्यंत चाळीसहून अधिक गोविंदा पथकाने या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावत थर रचले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण स्वतः या दहीहंडीला उपस्थित आहेत. सकाळपासून पाऊस सुरू होत असल्याने गोविंदा पथकांचा उत्साह वाढल्याचे दिसून आला.


डोंबिवलीतील दीपेश म्हात्रे फाउंडेशन तर्फे स्वराज्य दहिकाला उत्सवास सुरुवात झाली. सकाळपासून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाने हजारी लावली आहे. पावसामुळे गोविंदा पथकामध्ये एकच उत्साह दिसून येतोय. डोंबिवलीतील क्षितिज संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या गतिमंद विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून दहीहंडी उत्सवात सुरुवात केली. यावेळी गतिमंद विद्यार्थ्यांनी दही हंडी फोडून नाचत दहीहंडी उत्सवाचा आनंद लूटला. कल्याण पूर्वेतील ढोकलीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी कुणाल पाटील फाऊंडेशनच्या वतीन भव्य दहिहंडीचे आयोजन केले आहे.


त्या ठिकाणी हंडी फोडण्याकरिता आणि सलामीसाठी अनेक दहिहंडी गोविंदा पथकाने हजेरी लावली. हंडी फोडण्याचा आनंद लुटला. त्याचबरोबर कल्याण बल्याणी परिसरातील साई प्रतिष्ठान तर्फे माजी नगरसेविका नमिता पाटील आणि माजी नगरसेवक मयुर पाटील यांच्या पुढाकाराने भव्य दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी टिटवाळा, कल्याण परिसरातील गोविंद पथकाने हंडी फोडण्यासाठी सलामी दिली. त्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. 


कल्याण पूर्वेत शिवसेना शहर शाखाच्या वतीने शिवसेना विधानसभा प्रमुख निलेश शिंदे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवलीत शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण शाखेतर्फे शहर प्रमुख मनोज घरत यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

टिप्पण्या