महापालिकेच्या २/ब, ४/जे व ९/आय प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई

२/ब प्रभागाचे सहा. आयुक्त राजेश सावंत यांनी कल्याण (प) येथे केली अनधिकृत बांधकामवर मोठी कारवाई
DT न्यूज/स्वदेश मालवीय
कल्याण : महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार २/ब प्रभागाचे सहा. आयुक्त राजेश सावंत यांनी कल्याण (पश्चिम) येथील मुथा कॉलेज समोरील खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेल्या भूखंडावरील टपरीवजा बांधकाम पूर्णत: निष्कासनाची धडक कारवाई केली. तसेच कल्याण (पश्चिम) बारावे गाव येथील चालू असलेले ४ अनधिकृत गाळ्यांचे बांधकामावर पूर्णत: निष्कासनाची धडक कारवाई केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी.बी.च्या सहाय्याने करण्यात आली.

त्याचप्रमाणे ४/जे प्रभागाच्या सहा.आयुक्त सविता हिले यांनी कल्याण (पूर्व) नेतीवली टेकडी येथील चालू गोडाऊनच्या बांधकामाबाबत प्राप्त तक्रारीनुसार प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करुन सदर चालू अनधिकृत वीट बांधकामावर* निष्कासनाची धडक कारवाई केली. *सदर कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या कर्मचा-यांनी हातोड्याच्या सहाय्याने केली.


९/आय प्रभागातही सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी *कल्याण (पूर्व) आडीवली ढोकली अनंता पाटील चौक येथील ०९ अनधिकृत गाळ्यांवर* निष्कासनाची धडक कारवाई केली. *सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व फेरीवाला हटाव पथक कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी.बी. व ३ मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

टिप्पण्या